#

Advertisement

Tuesday, March 21, 2023, March 21, 2023 WIB
Last Updated 2023-03-21T17:55:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आधी डोळा मारला, आता बुक्की मारली...

Advertisement


मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या नव्या व्हिडिओमुळे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनतर आता त्यांच्या बुक्की मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांना अजित पवार हळूच बुक्की मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. शंभूराज देसाई यांना गुपपूच मारलेल्या बुक्कीचा अर्थ काय याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.  विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारूख शेख यांना पाय-यांवर सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अजितदादांनी देसाईंसोबत केलेल्या मस्करीचं दृश्यं कॅमे-यात कैद झाले आहे.  शंभूराज देसाई यांनी आपला हात दादांच्या हातामागे नेला आणि लगेचच अजितदादांनी त्यांच्या मांडीवर जोरात बुक्की  लगावली. त्यानंतर दोघेही मिश्कीलपणे हसले. मात्र दोघांमध्ये नेमकं काय झालं यावरून आता जोरदार चर्चा रगंली आहे.