#

Advertisement

Saturday, March 11, 2023, March 11, 2023 WIB
Last Updated 2023-03-11T17:41:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

"स्व. अनुराधाताई ढोबळे कर्तुत्वान महिला पुरस्कारां'चे वितरण

Advertisement

 

सोलापूर : मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे "स्व. अनुराधाताई ढोबळे कर्तुत्वान महिला पुरस्कारां'चे वितरण शुक्रवारी महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. आशालता जगताप, वसुंधरा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना गायकवाड उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. समीना नदाफ, प्रा. डॉ. वासंती पांढरे उपस्थित होत्या. यावेळी निवृत्त सैनिक पत्नी शोभा मनोज लामतुरे, पोलीस खात्यातील शत्रूराणी युसुफ इनामदार, आरोग्य खात्यातील सारिका सुरेश पाटील, शिक्षण क्षेत्रातील डॉ. पद्मश्री भोजे तसेच गृहिणी दिपाली संजय कोठावदे यांना कर्तुत्वान महिला पुरस्काराने कर्तुत्वान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
प्राचार्य मीन गायकवाड म्हणाल्या की, शिक्षक हा जागरूक असलेला घटक असून त्यांना नव्या आणि जुन्याचा मेळा घालता आला पाहिजे. महिलांनी सर्व क्षेत्रात प्रगती करावी.
महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ. समीना नदाफ म्हणाल्या की, प्रमाणिक काम केल्याने मिळालेले यश दीर्घकाळ लक्षात राहते. स्पर्धेच्या युगात आर्थिक जबाबदारी महिलांनीही घ्यावी. यातूनच कुटुंबाचा आणि समाजाचा विकास होईल.
यावेळी विविध परीक्षांमध्ये, स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सत्कार याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. रेश्‍मा जाधव यांनी प्रास्ताविक केले. नेहा गिराम यांनी सूत्रसंचालन तर कोमल पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. वासंती पांढरे, प्रा. तय्यब शेख, प्रा. देवकांत गुरव, प्रा. सचिन हेडे, प्रा. वर्षा माने, प्रा. रेश्‍मा जाधव, रेवप्पा दसाडे, दीपक दराडे, बीएडच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.