#

Advertisement

Saturday, March 18, 2023, March 18, 2023 WIB
Last Updated 2023-03-18T12:00:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बारामती येथील ऍग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल

Advertisement

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ऍग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्‍चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ग्रोचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
इंदापूर तालुक्‍यातील शेटफळगढे येथील बारामती ऍग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्‍टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले.
मात्र, त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दि. 8 मार्च 2023 रोजी भिगवण पोलिसांत बारामती ग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.