#

Advertisement

Saturday, March 25, 2023, March 25, 2023 WIB
Last Updated 2023-03-25T16:29:25Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

जागतिक महिला बॉक्सिंग : भारताला आणखी एक गोल्ड मेडल

Advertisement

दिल्ली : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने आणखी एक गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. 81 किलो वजनी गटामध्ये स्विटी बोराने गोल्डन पंच लगावला आहे. स्विटीने 4-3 ने सामना जिंकला आहे. स्विटीने चीनच्या बॉक्सरला धूळ चारत गोल्ड मेडल पटकावले आहे. नीतू घंघासने पाठोपाठ स्विटी बोराने सुद्धा गोल्डन कामगिरी करून आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लीना हिला हरवून स्विटीने गोल्ड मेडल पटकावले आहे. स्विटीने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकला. स्विटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर आपलं वर्चस्व राखलं होतं. पहिल्या फेरीतच तिने जोरदार पंच लगावत देशी हिसका दाखवला होता. पहिली फेरी 3-2 अशी जिंकली.