Advertisement
| ऍड.
कोमलताई साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन सोलापूर : शाहू शिक्षण संस्थेच्या मंगरूळ गैबीपीर रोड येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा यांच्यावतीने संस्थेच्या विश्वास्त ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे तसेच समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शाळा व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. यानुसार मंगळवारी (दि. 28) तालुकास्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धा होणार आहे, यामध्ये प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज, युगप्रवतर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर, परिवर्तनवादी साहित्यरत्न लोकशाही आण्णा भाऊ साठे, विद्यार्थी कसा असावा हे विषय देण्यात आले आहेत. 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाची दोन बक्षिसे 1039 रू. द्वितीय क्रमांकास 539 आणि तृत्तीय क्रमांकास 221 रूपये बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच, बुधवारी (दि.29) तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे, यामध्ये 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी मुले आणि मुले स्वतंत्र गट अशी विभागवारी आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 1039, द्वितीय क्रमांस 539 आणि तृतीय क्रमांस 239 रूपये बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच, या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्रीमती घोडके मॅडम 7666197311, सावंत सर 9960163832, गायकवाड सर 8080781148 आणि चव्हाण सर 6362919105 यांच्याशी संपर्क साधावा. दरम्यान, समाजोपयोगी उपक्रमातून गुरूवारी (दि.30) निराधार महिलांना मोफत साडी वाटप तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. | |||
