Advertisement
मुंबई : जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे अनेकांना फटका बसला आहे. आता राजपत्रित अधिकाऱ्यांनी 28 मार्चपासून संपात प्रत्यक्ष सामिल होण्याचा इशारा दिला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधान भवनात बैठक सुरू आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राजपत्रित अधिकाऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू आहे. मागण्या मान्य झाल्यास आजच तोडगा निघून संप मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेली बैठक यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यभरात राज्यपत्रित अधिकारींची संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. पुढील तासाभरात संप मागे घेण्याची अधिकृत घोषणा संघटनेकडून केली जाणार आहे. तर, जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. आज संपाच्या सातव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर घंटा नाद आणि थाळी नाथ आंदोलन सुरू केले आहे. अमरावती येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर जिल्हा परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात एकत्र होऊन थाळी नाद आंदोलन सुरू केले आहे. या शिवाय वनविभाग,पोलिस आयुक्त कार्यालय,मेळघाट व्याघ्र प्रकल्प व सार्वजनिक बांधकाम विभागा सह सर्वच कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत थाळीनाद आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून मागणी पूर्ण झाल्या शिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली.
