Advertisement
सांगली : जिल्ह्यातील जतचे माजी नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संदीप चव्हाण, निकेश मदने, आकाश व्हंनखंडे, किरण चव्हाण यांना कर्नाटकातून अटक केली आहे. तर उमेश सावंत फरार आहे. उमेश सावंत हे भाजपचे नगरसेवक आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्य आरोपी उमेश सावंत यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील जतचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर शुक्रवारी गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी माजी नगरसेवक उमेश सावंत यांचे नावही तक्रारीमध्ये होते. मृत विजय ताड यांचे भाऊ विक्रम ताड यांनी याप्रकरणी तक्रार दिली होते. विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंत यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता, असे फिर्यादित नमूद करण्यात आले होते. त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष होता हे समोर आलं आहे. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना केली आहेत.
