Advertisement
पुणे : उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याची कुठेही चर्चा नाही. बंद खोलीत नाही आणि ओपन गार्डनमध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय. असे काही चान्स नाहीत. पण राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. आता आरोप प्रत्यारोप खूप झाले शद्ब वापरून काहीही होत नाही. लोकांना हे आवडत नाही. त्यामुळे आता हे थांबवलं पाहिजे. मालेगावमध्ये उर्दू पोस्टर लागणे हे काय लगेच हिंदुत्व सोडलं असं नाही. मुस्लिम समाजाला उद्धव ठाकरे यांनी काही आश्वस्त केलं असेल म्हणून मालेगाव मध्ये बोर्ड लागले असतील, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मालेगावच्या सभेवर प्रतिक्रिया दिली.
'उद्धव ठाकरे आणि फडणवीस परत एकत्र येण्याची कुठेही चर्चा नाही. बंद खोलीत नाही आणि ओपन गार्डन मध्ये पण नाही. सुतावरून काही परीक्षण केलं जातंय. असे काही चान्स नाहीत. पण राजकारण कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
