Advertisement
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसेप्रमुख राजे ठाकरे यांना भेटले यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना शिरसाट यांची जीभ घसरली.
ते म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंकडे भेटण्यासाठी घेऊन जातो. त्यांची भेटण्याची तयारी आहे का? राज ठाकरे तुमच्यासारखे नाहीत, सकाळी उठायचं आणि कुत्र्यासारखं भो-भो भुंकायचं. राज ठाकरे एकदाच बोलतात पण सगळ्यांची हवा टाईट होऊन जाते. संजय राऊत मूर्खांच्या नंदनवनात वावरणारे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. आता संजय शिरसाट यांच्या टीकेला राऊत काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
