Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे शरद पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शरद पवारांचा लूक तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या फोटो शरद पवार चक्क फ्रेंच कट दाढीत दिसत आहेत. शरद पवारांचा या लूकवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचं वडीलप्रेम सर्वज्ञात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा वडिलांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळेच अनेकदा त्या शरद पवारांचे जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देत असतात. अशातच त्यांनी नुकताच शरद पवारांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो फार जुना असल्याचं दिसत. हा फोटो एखाद्या कार्यक्रमातला दिसत असून शरद पवारांच्या बाजूला त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही बसलेल्या दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी 'नोस्टाल्जिया' अशी कॅप्शन दिली आहे.
