#

Advertisement

Friday, March 24, 2023, March 24, 2023 WIB
Last Updated 2023-03-24T11:36:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सोलापुरात तीन हजार नागरिक एकत्र ऐकणार पंतप्रधान मोदींची "मन की बात'

Advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांचा उपक्रम

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मन की बात' हा रेडिओवरील कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचे फेब्रुवारीमध्ये 98 भाग प्रसारित झाले आहेत. तर, या महिन्यांत 99वा आणि 30 एप्रिलला 100वा भाग प्रसारित होणार आहे. देशवासियांसह सोलापूरकरांना या कार्यक्रमच्या 100 व्या भागाचे वेध लागले आहेत. मन की बातचा 100 वा भाग पुढील महिन्यांत 30 एप्रिलला प्रसारित होणार आहे. हा भाग सोलापुरातील प्रत्येक घटकातील नागरिकापर्यंत पोहचावा, मोदीजींची विचार सर्वत्र पोहचावेत, या उद्देशाने शाहू शिक्षण संस्थेंच्या प्रांगणात किमान तीन हजार नागरिक एकत्रितपणे मोदीजींची मन की बात ऐकतील, असे नियोजन करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना ढोबळे म्हणाले की, देशात तसेच राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या उपक्रमांची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. त्यानुसार आलेल्या आदेशानुसार सोलापुरातही या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मन की बातचा 100वा भाग 30 एप्रिल सोलापूर जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या कार्यक्रमाचा 100वा भाग जिल्ह्यातील अधिकाधिक बूथवर प्रसारित करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या 100व्या भागाचे प्रसारण परदेशातही प्रसारित करण्यासाठी भाजपची योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आतापर्यंत नमूद केलेल्या सर्वांना 30 एप्रिलच्या या रेडिओ कार्यक्रमाशी जोडण्याची तयारी सोलापूरात भाजपने केली आहे. याशिवाय भाजपची सत्ता असलेल्या प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेतेही मन की बात कार्यक्रम ऐकणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान 100 जागांवर मन की बात ऐकावी, असे उद्दीष्ट ठेवण्यात आजल्याचेही माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.