#

Advertisement

Monday, March 20, 2023, March 20, 2023 WIB
Last Updated 2023-03-20T12:17:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

'सोमटणे टोल हटाव'ला बहुजन रयत परिषदेचाही पाठिंबा

Advertisement

 



सोमाटणे :
टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्यासह नागरिकांनी तळेगाव दाभाडे येथील विठ्ठल रुक्‍मीनी मंदीर येथे उपोषण सुरू केले आहे. याची तातडीने दखल घ्यावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियत्यांस देण्यात आले होते. या आंदोलनाला बहुजन रयत परिषदेसह वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्ष तसेच ग्रामपंचायती या उपस्थित राहून या आंदोलनास पाठिंबा दिला.
तळेगाव दाभाडे येथे आंदोलकांनी पुढील मुद्याला अनुसरून उपोषण केले. यामध्ये सोमाटणे येथील टोलनाका परिसर हा अत्यंत छोटा आहे. या परिसरात लेन कमी असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. बांधा-वापरा हस्तांतरण करा या तत्वावर सोमाटणे टोलनाका उभारला असतांना 2004 ते 2019 या पंधरा वर्षात प्रकल्प रक्कमेच्या दुप्पट वसुली झाली कारणाने पुढील वाढविण्यात आलेली मुदत ही नियमबाह्य आहे. सड़क परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय यांचेकडील दिनांक 05 डिसेंबर 2008च्या राजपत्रानुसार 2 टोलनाका मधील अंतर हे 60 कि.मी पेक्षा जास्त असावे लागते तसेच नगरपालिका पालिका हद्दीपासून 10 कि.मी च्या आत मध्ये टोलनाका असू नये असे असताना देखील सोमाटणे टोलनाका हा तळेगाव दाभाडे नगर परिषद क्षेत्रापासून अगदी 2 कि.मी अंतरावर आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील ऊर्से येथील टोलनाका हा सोमाटणे टोलनाक्‍यापासून 6 कि.मी अंतरावर आहे त्यामुळे सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर असून तो तात्काळ बंद करावा. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक कामे प्रलंबित असतांना तसेच कुठलीही सोयी-सुविधा नपुरविता टोल वसुली करणेत येत आहे. स्थानिक नागरीक यांचेकडून जाचक पध्दतीने टोल वसुली करण्यात येत आहे. स्थानिक नागरीकांना मोफत टोलचे अमिष दाखवून या नागरिकांकडून टोल वसुली करण्यात येत आहे.
या सर्व बाबींचे अवलोकन करता सोमाटणे टोल अवैध असल्याने सदरचा टोलनाका हा त्वरीत बंद करावा अन्यथा सोमाटणे टोलनाका बंद होईपर्यंत आमचे उपोषण सुरु राहील, अशी मागणी आंदोलनकर्त्यानी केली आहे.