#

Advertisement

Saturday, March 11, 2023, March 11, 2023 WIB
Last Updated 2023-03-11T12:07:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीचे छापे

Advertisement

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पुन्हा ईडीचे छापे पडलेत. ईडीने गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा हे छापे टाकले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकण्यासाठी आले. 10 गाड्यांमधून ईडीचं हे पथक दाखल झाले आहे. मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले.
हसन मुश्रीफ यांना अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत.  पुन्हा एकदा आज हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही वाहतुकाला बंद करण्यात आला आहे. 
दरम्यान, मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. यावेळी ईडीकडून चौकशीही करण्यात आली.  मुश्रीफ यांच्या घरावर आणि बँकेत छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी ईडीने पुणे आणि कोल्हापूर येथे छापे टाकले होते. 11 जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने केली होती. कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यावेळी काही कागदपत्र जप्त करण्यात आली होती.