#

Advertisement

Saturday, March 11, 2023, March 11, 2023 WIB
Last Updated 2023-03-11T12:00:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मनसैनिक वैतागले, नवी मुंबईत मोठे खिंडार

Advertisement

मुंबई : शहरात मनसेला मोठा धक्का बसला असून नवी मुंबई उप शहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांच्यासह अन्य पाच जणांनी शहर प्रमुख गजानन काळे यांच्या जाचाला कंटाळून आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनमे दिले आहेत. यात प्रवीण गाडेकर, उप विभाग अध्यक्ष, चंद्रकांत सकपाळ, उप विभाग अध्यक्ष, रोहन चव्हाण, सुशांत सैद, रोहित सैद सर्व शाखा अध्यक्ष यांचा समावेश आहे. या सर्वांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपण गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपल्या पदाचे राजिनामा देत असल्याचे सांगितले.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद घोरपडे यांनी गजानन काळे यांचे अनेक ठिकाणी आर्थिक हितसबंध असल्याचा आरोप केला. आम्हाला पक्षात काम करण्याचे स्वातंत्र्य नाही, काही बोलता येत नाही, काही करताही येत नाही. एखाद्या समाजोपयोगी कामासंदर्भात नवी मुंबई महानगर पालिकेसोबत पत्र व्यवहार केल्यावर आम्हाला पालिकेचे अधिकारी कोणताही प्रतिसाद देत नाहीत. आम्ही विचारणा केल्यावर शहर प्रमुख यांच्यासोबत आर्थिक हितसबंध असल्याचे सांगून आम्ही या संदर्भात काहीच करू शकत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आपण पदावर असल्याने जनेतेला न्याय देता येत नाही, त्यामुळे पदावर राहून काय उपयोग म्हणून मी पदाचा राजीनामा दिल्याचे घोरपडे यांनी सांगितले.  मात्र, अजूनही आम्ही अन्य पक्षात जाण्याचा विचार केला नसून पक्षाचे सदस्य म्हणून काम करत राहू. मात्र, पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल असे घोरपडे यांनी स्पष्ट केले.