#

Advertisement

Tuesday, March 28, 2023, March 28, 2023 WIB
Last Updated 2023-03-28T10:36:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनाही दिल्ली कोर्टाचा समन्स

Advertisement

मुंबई :  दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मानहाणीच्या दाव्याबाबत याचिकेवर 17 एप्रिलला सुनावणी होणार आहे. या याचिकेवर सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. प्रत्येक सभेत आणि पत्रकार परिषदांमध्ये बंडखोर आमदारांना गद्दार म्हणून उल्लेख केला जात आहे. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी दिल्ली कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. ठाकरे गटाकडून वारंवार शिवसेनेच्या आमदारांचा 'गद्दार, पन्नास खोके एकदम ओके' अशी वक्तव्य वापरून बदनामी केली जात असल्याची तक्रार या याचिकेतून करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी आदित्य ठाकरेंसह आणि संजय राऊतांना समन्स बजावला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये उद्धव ठाकरेंना कोर्टात हजर राहावं लागणार आहे.