Advertisement
पुणे : अवकाळी पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बसल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी फळाबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. मंचर अवसरी परिसरात रात्री जोरदार गारपीट झाली. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले आहे. कांदा, गहू, हरभऱ्यासह मिरची, पपई, केळी बागांचं मोठे नुकसान आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात गारपिटीनं पिक भुईसपाट झाले आहे. शेत, रस्ते, अंगणात टपोऱ्या गारांचा खच. पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर येवल्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. अंदरसुल परिसरात कांदा,आणि गहू जमीनदोस्त झालंय..काढून ठेवलेला 3 एकरांवरचा कांदा भिजलाय..ढगाळ वातावरण आणि पाऊस यांमुळे मक्याचं देखील प्रचंड नुकसान झाले आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या मंचर अवसरी परिसरात रात्री गारपीट झाली. गारांचा खच पडल्याचं दृश्यांमध्ये दिसून येतंय. गारपिटीमुळे बळीराजाच्या शेतमालाचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, द्राक्ष, डाळिंबाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
