Advertisement
पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून तब्बल ३० लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. या धमकी प्रकरणामुळे मनसे सैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवले आहे. अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करत रूपेश मोरे याला 30 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे. या धमकीकडे आधी वसंत मोरे यांनी दुर्लक्ष केलं. पण वारंवार धमकी देण्याचे प्रकार सुरूच होते. अखेर या प्रकरणी वसंत मोरे यंनी भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आदारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
