Advertisement
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान सोहळ्याचे अयोजन
लक्षवेधी : विशाल खंदारेपुणे : माझे दैवत... सन्माननिय प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब....अशा वाक्याने आपल्या प्रत्येक भाषणाची सुरूवात करणाऱ्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी दि. 30 मार्चला राज्यभरात विविध कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या कन्या असलेल्या ऍड. कोमलताई यांनी गेल्या काही वर्षांत बहुजन रयत परिषद राज्यभरातील वाड्यावस्त्यांपर्यंत पोहचविली आहे. लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषदेने ऍड. कोमलताई यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने उभारी आणि भरारी घेतली आहे. आज, राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुका पातळीवर बहुजन रयत परिषदेची शाखा सुरू झाली आहे. अगदी मोठमोठ्या राजकीय पक्षांनाही जे जमले नाही, ते ऍड. कोमलताई यांनी आपले वडील ढोबळे सरांच्या मार्गदर्शनानुसार करून दाखवले आहे. बहुजन रयत परिषदेचे आज राज्यभरात स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे, याच कारणातून भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या पक्षांनीही याची दखल घेतली आहे. याचे संपूर्ण श्रेय स्वत: लक्ष्मणराव ढोबळे हे कन्या ऍड. कोमलताई यांना देतात.
राज्याचे राजकारण सध्या वेगळे टप्यावर असताना बहुजन रयत परिषदेची ताकद राज्यभरात वाढत असल्याने भारतीय जनता पक्षात स्थित असले तरी लक्ष्मणराव ढोबळे यांची स्वत: ताकद बहुजन रयत परिषेतून निर्माण झाली आहे. यासाठी ऍड. कोमलताई यांनी मोठे कष्ट घेतल्याचे स्वत: ढोबळे सांगत असताना आणखी खूप काही काम बाकी असल्याचे तसेच बहुजन रयत परिषद आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता मोठा व्हायला हवा, असे ऍड. कोमताई सांगतात. त्यांच्या या विचारातूनच बहुजन रयत परिषद आता राजकीय पक्ष होण्याकडे वाटचाल करीत आहे. ऍड. कोमलताई यांच्या याच कार्याचा सन्मान त्यांच्या वाढदिनी गुरूवारी दि.30 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. शाहु शिक्षण संस्थेच्या भोसरी येथील राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

