#

Advertisement

Tuesday, March 28, 2023, March 28, 2023 WIB
Last Updated 2023-03-28T16:41:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री झाले, डॉक्टर एकनाथ शिंदे !

Advertisement

मुंबई : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि शिंदे कुटुंबीयांसाठी खास क्षण होता. नवी मुंबईतील D.Y पाटील विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द मानद डिलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आता डॉ.एकनाथ शिंदे म्हणून ओळखले जाणार आहे.
D.Y पाटील विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द मानद डिलिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. सदर कार्यक्रम नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानात पार पडला. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे भारावून गेले. आज मला पदवी मिळाली माझे वडील पण आहेत. सर्व कुटुंब आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि अधिकारी आहेत. कौटुंबिक जबाबदारी मुले मी शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे खंत होती. पण तीन वर्षापूर्वी मी बी ए डिग्री घेतली. आणखी काही करायचे आहे. मात्र मधला माझा वेळ एक ऑपरेशन करण्यात गेला' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली.