Advertisement
सोलापूर : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोलापूर विद्यापाठाची चांगल्या कारणांमुळे चर्चा होत आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी 55 कोटी रुपयांच्या तरतूदीची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर हे विद्यापीठ अभिमत विद्यापीठ म्हणूनही गोषित करण्यात आलं आहे.
राज्य सरकारनं अभिमत विद्यापीठाची घोषणा केल्यामुळे वेतन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतचे प्रश्न आता विद्यापीठ पातळीवर सोडवले जाणार आहेत. त्याचबरोबर कुलगुरूंना आता अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे परीक्षांचे निकाल आणि नियोजन व्यवस्थित होईल आणि प्रशासकीय कामात सुधारणा होईल, अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
