#

Advertisement

Friday, March 10, 2023, March 10, 2023 WIB
Last Updated 2023-03-10T12:41:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

स्वत:मध्ये बदल घडविण्यासाठी महिलांनी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement



भोसरी : महिलांसाठी आज सर्व क्षेत्र खुली झाली आहेत, शिक्षण, राजकारण यामध्ये आरक्षण आहे. परंतु, त्यानंतरही महिलांची पाऊले खरोखरच प्रगतीच्या दिशेने पडत आहेत का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. बंध झुगारून जो पर्यंत महिला स्वत: पुढे येत नाहीत तो पर्यंत महिलांची प्रगती झाली किंवा होत आहे, असे म्हणता येणार नाही. स्वत:मध्ये बदल घडविण्यासाठी महिलांनी स्वयंस्फुर्तीने पुढे यायला हवे, असे आवाहन करीत शाहु शिक्षण संस्थेच्या संचालिका तथा बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
ओऍसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग व सावली फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनी (दि.8) विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलां मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी ऍड. कोमलताई यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबतीत महिलांची सद्य स्थिती विशद करताना ऐतिहासिक तसेच वर्तमान काळातील स्त्री याचे संदर्भ देत अमुल्य मार्गदर्शन केले. रंजना धोपेश्वरकर, मुख्याध्यापिका ऍड. शुभा पिल्ले यांनीही महिला दिनी प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी आई व मुलीचा रॅम्प वॉक तसेच 18 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन युवतींसाठी सेपरेट वेर्स्टन वेशभूषा फेरी घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 55 ते 60 महिलांनी सहभाग घेतला. ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भागवी चिरमुले यांची विशेष उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरूवात कृष्ण व यशोदामातेचे वात्सल्य दर्शविणारे सांस्कृतिक नृत्य ओऍसिस इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका दर्शना पासकंठी यांनी सादर केले. त्यानंतर मुख्य तीन रॅम्पवॉक सादर झाले. या स्पर्धेसाठी आरएसए ब्युटी ऍन्ड मेकअप इन्स्टिट्यूटच्या संस्थापक संचालिका धनश्री दहिवाळ-शेखरे, अताह लाईफ स्टाईल क्‍लथिंग ब्रॅंड व फेमिना ब्लिंग्सच्या संचालिका आफरिन खान, ओऍसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगच्या प्रमुख रंजना धोपेश्वरकर यांनी परीक्षण केले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या महिला देखील उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुणे बहूजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे, इनबॉंड मीडिया लि.चे संचालक अजय साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते सचिन वाघमारे, बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, बहुजन रयत परिषदेचे संपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, सावली फाउंडेशनचे समन्वयक बबन गायकवाड व उमा नायडू उपस्थित होते. तसेच, कार्यक्रमासाठी भोसरी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

महिलांनी जिंकली बक्षिस
आई व मुलीचा रॅम्प वॉक : प्रथम - प्रिया व स्वामिनी रसाळ, द्वितीय - राणी व राजनंदिनी, तृतिय - प्रिया व रोशनी शर्मा तसेच 18 ते 25 वयोगयाटीत मुली : प्रथम - पुजा मोहन परीले, द्वित्तीय-दिपांशी साटनकर, तृतिय - स्वेजल पाटील. बक्षिसासचे स्वरूप : पहिले बक्षिस 5001 रु. व ट्राफी, दुसरे बक्षिस 3001 रु. व ट्रॉफी आणि तिसरे बक्षिस 2001 रु व ट्रॉफी. याशिवाय सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.