#

Advertisement

Friday, March 24, 2023, March 24, 2023 WIB
Last Updated 2023-03-24T11:48:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

'चोराला चोर म्हणणं हा...', उद्धव ठाकरेंचा घणाघात

Advertisement

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या या कारवाईवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधीवर झालेली कारवाई चुकीची असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.