Advertisement
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त टीका करणे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. राहुल गांधी यांची खासदारकीच रद्द करण्याचा निर्णय संसदीय समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी नेमका लोकसभा अध्यक्षांचा कोणता नियम मोडला, ज्यामुळे खासदारकी रद्द झाली आहे, अशी चर्चा रंगली आहे.
सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं. त्यामुळे हा संसदीय समितीने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीका केल्यामुळे राहुल गांधी यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. 'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे? असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र त्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन दिला होता.
राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार तसंच गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत हे वक्तव्य केलं होतं.
राहुल गांधींनी कोणता नियम मोडला?
संसदेची नियमावली 352 (2) नुसार, एक खासदार हा फक्त लोकसभा अध्यक्षांना माहिती देऊनच संसदेतील इतर सदस्यांबद्दल टिप्पणी करू शकतो. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टीका केली होती. त्यामुळे त्यांनी हा नियम मोडला असा ठपका ठेवण्यात आला. भाजप खासदारांनी विशेष अधिकार समिती समोर 1976 ची घटना मांडली होती.
