#

Advertisement

Monday, March 27, 2023, March 27, 2023 WIB
Last Updated 2023-03-27T11:31:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

इंदुरीकर महाराजांच्या किर्तनात गौतमी पाटीलचे नाव

Advertisement


शिर्डी : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे यांनी पुन्हा एकदा प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील वर निशाणा साधला आहे. आपल्या किर्तनातच इंदुरीकर महाराज यांनी गौतमीचे नाव घेतले आहे.  इंदुरीकर महाराज यांनी आपल्या खास शैलीत गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी गौतमीच्या डान्स स्टेपवर देखील टीका केली आहे. 
बीडनंतर आता शिर्डीमध्ये देखील कीर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी नाव न घेता पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. मात्र, तीन गाण्याला लोकं दीड लाख रुपये देतात...तीनच गाणी पण शिट्ट्या किती? असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी थेट गौतमी पाटील किती मानधन घेते हेच सांगितले आहे. 
पाटलाचा गाडा या गाण्यावर गौतमीचा डान्स सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. यावरुन देखील इंदुरीकर महाराजांनी गौतमीवर टीकास्त्र सोडले. गाडा आला आणि घाटात राडा झाला...असे म्हणत, थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकरांनी उपस्थितांना दिला. शिर्डीत महापशुधन एक्स्पोच्या समारोपानिमित्ताने इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी गौतमीवर त्यांनी निशाणा साधला.