Advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेर भागामध्ये मोठी घटना घडली आहे. पावसाच्या आडोशाला थांबलेल्या प्रवाशांवार होर्डिंग कोसळले आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवाशी थांबले होते. पण अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात आठ जण अडकले होते. स्थानिकांनी तातडीने जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीम आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
दुर्घटनेतील मृतांची नावं : भारती मंचळ (वय-30 रा. शितलनगर, देहूरोड), शोभा विनय टाक (वय-50, रा. पारशी चाळ, देहूरोड), अनिता उमेश रॉय (वय-45 रा. देहूरोड), वर्षा केदारे (वय-40 रा. शितलनगर, देहूरोड), राम प्रल्हाद आत्मज (वय-20, उत्तर प्रदेश)\
जखमींची नावे : रहमद मोहमद अंसारी (वय-21 रा. किवळे), विशाल शिवशंकर यादव (वय-20 रा. उत्तर प्रदेश), रिंकी दिलीप रॉय (वय-45 रा. देहूरोड)
