Advertisement
नाशिक : "ब्रेन ट्रेन एज्युकेशन फाउंडेशन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
वेदिक मंथ अँड अबॅकस' यांच्यातर्फे "नारीशक्ती सन्मान पुरस्कार 2023' सोहळ्याचे
उद्घाटन खासदार हेमंत गोडसे, पंढरपूर येथील शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका ऍड.
कोमलताई साळुंखे-ढोबळे, पुरस्कार समितीच्या अध्यक्ष वृंदा लवाटे, संस्थेच्या
अध्यक्ष नंदिनी निकुंभ व मानद सदस्य नरेंद्र निकुंभ व रूपाली फुले आदी
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ब्रेन ट्रेन फाउंडेशनचे मानद सदस्य नरेंद्र
निकुंभ यांनी प्रास्ताविक केले. अबॅकसचे शिक्षण देण्यास कटिवद्ध झालेल्या महिलांना
प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ब्रेन
ट्रेन सारख्या संस्थांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणास हातभार लागत असल्याचे
खासदार गोडसे यांनी सांगितले.
पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे : कुसुम निकम
(उपाध्यक्षा, जिल्हा परिषद धुळे), मंदा फड (उद्योजिका), डॉ. निवेदिता पवार (महिला
आरोग्य), अस्मिता देशमाने (सामाजिक), अर्चना दिडोरकर (सेवाभावी संस्था), माहेश्वरी
साबळे (सामाजिक संस्था) प्रा. सुनिता आडके (मतिमंद) मुलींच्या रहिवाशी संस्थेच्या
अध्यक्षा), रुपाली जोशी (गोसेवा ट्रस्ट), सुचेता सौदणकर (मतिमंद विद्यार्थी शाळा),
तृप्ती ढवण (महिला सक्षमीकरण), रिंकू पाटील (सामाजिक), मनीषा बागूल (तरुण
उद्योजिका), सुमन चव्हाण (इंग्रजी शाळा व्यवस्थापन), जानकी नाईक (इंग्लिश
प्रशिक्षक), स्वाती लाहिरी (अष्टपैलू व्यक्तिमत्व), सुप्रिया बागूल (क्रीडा
प्रशिक्षक), अंजली कदम : (अस्तित्व ढोल ताशापथक), नीता गोडसे : (सामाजिक संस्था),
दीपिका दुसाने (धाडसी मोहीम), कविता गायकवाड = (जिल्हा परिषद शिक्षक, मंगरूळ),
वैशाली पगारे (खासगी क्लासेस), प्रतिभा उबाळे (खासगी शिक्षक), सुवर्णा चौथाईवाले
(शिक्षण समिती सदस्य), वैदेही जोशी (रेडिओ जॉकी), सृष्टी नेरकर: (बाल संशोधक), दिसी
जानोरकर (चित्रकार), विजया नेरकर (सामाजिक कार्य).
