#

Advertisement

Tuesday, April 4, 2023, April 04, 2023 WIB
Last Updated 2023-04-04T17:57:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

50 खोके घेऊन चोर आले...शिंदे गटावर गाणं : रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. 40 आमदारांना सोबत घेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. यानंतर राज्यात सत्तांतर झाले. या सर्व घडामोडींनतर 50 खोके, गद्दार हे शब्द चांगलेच चर्चेत आले. ठाकरे गटाकडून या शिंदेगटावर गद्दार, चोर असे आरोप केले जातात. 50 खोके आणि चोर या शब्दांचा वापर करत एका रॅपरने शिंदे गटावर गाणं तयार केले. हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. शिंदे गटावर गाणं बनवणाऱ्या रॅपरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  राज मुंगासे असे या रॅपरचे नाव आहे. मुंगासे  विरोधात अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रॅपर राज मुंगासे याचे चोर आले, चोर आले, पन्नास खोके घेवून चोर आले अशा प्रकारचे गाणं सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या रॅपरच्या विरोधात शिंदे गटाकडून अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.