Advertisement
ठाणे : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ठाण्यात जोरदार राडा झाला आहे. ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणानंतर महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी ठाण्यात लढेल आणि जिंकून दाखवेल असं थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना दिलं आहे.
लोकामध्ये गद्दारांच्या सरकारबद्दल राग आहे. आज मोर्चासाठी येताना गाडीची काच खाली केली असता बस, फुटपाथवरील सगळे लोक आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगत होते. मोर्चा काढायचा असेल तर 17 अटी दिल्या आहेत. मी तर म्हणतो सर्वांवर केसेस टाका. आयुक्त कार्यालयासाठी टाळा आणला आहे. कारण, ज्यावेळी आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आयुक्तालयात गेलो तेव्हा कमिशनर पळून गेले असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तो पक्षच नाही, चोरांचा पक्ष असूच शकत नाही, त्यांची टोळी असू शकते.
ठाण्यातून लढून जिंकूल दाखवणार आहे. मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच स्वागत करायला आलो. ठाण्याला एका दिवसात इतकं बदमान केलं? त्यांचा माफीचा व्हिडिओ बनवून घेतला. दोन रुपयांसाठी आम्हाला ट्रोल करतात. जे ठाणे जगात प्रसिद्ध होते, एका दिवसात दाखवलं महिला देखील सुरक्षित नाही. उलट तिच्यावरच गुन्हा दाखल होता. माजी महापौर देखील गद्दारांच्या टोळीत आहेत.
