Advertisement
नागपूर : राजकारणात सध्या भेटी गाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज नागपूरमध्ये शरद पवार हे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी पोहोचले आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवस नागपूरच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळीच त्यांचं नागपूर नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची बैठक सुरू आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनिल देशमुखंही सोबत आहेत. विविध राजकीय आणि कृषी च्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या घरी जेवन करणार आहे.
