#

Advertisement

Saturday, April 1, 2023, April 01, 2023 WIB
Last Updated 2023-04-01T10:03:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

मुंबईच्या समुद्रात आढळली संशयास्पद बोट

Advertisement

मुंबई : समुद्रामध्ये पुन्हा एकदा एक बोट सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोटीवर एक पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्र किनाऱ्यापासून 100 सागरी मेल अंतरावर ही बोट सापडली आहे.  स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची एक बोट समुद्रात पोहोचली आहे. पण, यावर कारवाई ही नौदलाकडून होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जवळील पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. ही हद्द नौदल आणि तटरक्षक दलाच्या अंतर्गत येते, त्यामुळे पुढील कारवाई त्यानुसार होणार आहे.  या बोटीवर ही लोक कोण आहे आणि कुठून आली आहे, याबद्दल चौकशी सुरू आहे. टरक्षक दल आणि नौदलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे.