#

Advertisement

Monday, April 24, 2023, April 24, 2023 WIB
Last Updated 2023-04-25T01:46:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मृत मुलाच्या 'दलीत आई'स मारहाण ; गुन्हा दाखल करून पोलीस सुसाट आरोपी मोकाट

Advertisement

 

बहुजन रयत परिषेदेचे कार्यकर्ते आक्रमक, आयुक्तांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा 

 नाशिक : नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर, जि.नाशिक) येथील मातंग समाजाची महिला ताईबाई कैलास कुचेकर यांनी संदीप उर्फअनिल गंगाराम सहाणे यांना माझ्याच मुलाचा अपघात कसा झाला व तोच कसा मरण पावला हे विचारण्यास गेली असता संदीप सहाणे याने मृत मुलाच्या आईस गावाच्या भर चौकात जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. सदर आरोपीवर अनुसूचित जाती जमाती ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, इतर गुन्ह्याचा तपास सुसाट करणाऱ्या पोलिसांनी आरोपीस अद्याप पर्यंत अटक केलेली नाही. सदर आरोपीला ताबडतोब अटक करण्यात यावी, व त्याचे मटका जुगाराचे अड्डे बंद करण्यात यावे, या मागणीचे निवेदन बहुजन रयत परिषद नाशिक जिल्ह्याच्या वतीने आयुक्त कार्यालय नाशिक यांना देण्यात आले. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली नाही तर बहुजन रयत परिषेदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. 

या प्रसंगी  बहुजन रयत परिषेदेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब खंडाळे, राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव शृंगार, राज्य उपाध्यक्ष सुर्यकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक साठे, विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष शेजवळ, तालुका अध्यक्ष सुरेश कुचेकर व पीडित कुटुंबतील सर्व सदस्य ,व समाज बांधव उपस्थित होते.