Advertisement
| भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा समारोप लक्षवेधी : विशाल खंदारे सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा समारोप रविवारी (दि. 23) भव्यदिव्य मिरवणूक काढून करण्यात आला. सोलापुरातील डफरीन चौक ते आंबेडकर चौकादरम्यान निघालेल्या या भव्य मिरवणुकीत जवळपास शहर तसेच जिल्ह्यातील तीन लाखांपेक्षा अधिक अनुयायी सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील समाजबांधव, युवकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, बुद्धम् आदी विषयांवर विविध आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. छत्रपती शहाजीरांचा रथ, स्रमाट अशोक चौक यांचा बुद्धम् रथ, संत चोखामेळा धर्मशाळा, पंढरपूर यांचा कर्मवीर रथ, सोलापुरातील कर्मवीर सामाजिक संस्थेचा क्रांतीकारक रथ, यांच्यासह ए.जे. ग्रुपने केलेला हत्तीवर बसलेले बाबासाहेब आणि प्रशिक सामाजिक संघटनेने शाहिरांचे बाबासाहेब हे सर्व देखावे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. याशिवाय व्हायोलिन वाजवणारे बाबासाहेब आणि शाहिरांचे एक गाणे माझ्या 10 भाषणाएवढ्या ताकदीचे आहे. या डॉ. आंबेडकरांनी केलेल्या उल्लेखासह अण्णा भाऊ साठे, वामनदादा कर्डक, शाहीर साबळे, प्रल्हाद शिंदे यांच्या छायाचित्रांसह असलेल्या देखाव्यांनी सोलापुरकरांचे लक्ष वेधले. शहरातून निघालेल्या मिरवणुकीत बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कायकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सेवाही बजावली. | |||


