#

Advertisement

Monday, April 10, 2023, April 10, 2023 WIB
Last Updated 2023-04-10T11:34:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

जगातील तिसरी लेझर गुरुत्वीय लहरी वेधशाळा औंढा-नागनाथमध्ये उभारली जाणार, केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

Advertisement

नवी दिल्ली : जगातील तिसरी लेझर गुरुत्वीय लहरी वेधशाळा औंढा-नागनाथ इथं उभारली जाणार आहे. औंढा (नागनाथ) तालुक्यातील लायगो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच 300 एकर जमीन संपादित केली आहे. यासाठी लागणारी सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण झाली. पण अनेकवेळा या भागाची पाहणी-सर्व्हे करण्यात आले असातना मध्येच हा प्रकल्प इथून इतरत्र हलविण्याचे प्रयत्न सुरु झाले. 
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मात्र हा प्रकल्प इतर कुठेही हलवू नये यासाठी केंद्रीय अंतराळ आणि अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्यासह पृथ्वीविज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांची भेट घेऊन तात्काळ हा प्रकल्प मार्गी लावावा या संदर्भात बैठक बोलवावी अशी मागणी केली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील त्यांनी घेतली होती. 
औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा परिसरात लेसर इन स्फेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हा प्रकल्प उभारण्याकरीता वन विभागाकडुन 121 हेक्टर जमीन हस्तांतरणास केंद्राच्या वन व पर्यावरण विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे. या प्रकल्पासाठी जमीन हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या उभारणीतील अडथळा दूर झाला आहे. या प्रकल्पाला 17 फेब्रुवारी 2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने लायगो इंडिया प्रकल्पास तत्वतः मंजुरी दिली आहे.