#

Advertisement

Monday, April 10, 2023, April 10, 2023 WIB
Last Updated 2023-04-10T11:19:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा

Advertisement

दिल्ली : शिवसेना शिंदे गट आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबईतील वकील आशिष गिरी यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 
शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिंदे गटला दिले आहे. त्यामुळे शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना झाली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये पक्षनिधीबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती. म्हणून मुंबईचे वकील आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची चल -अचल संपत्ती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात आता काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.