Advertisement
दिल्ली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयही खडबडून जागं झालं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत करोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नियमावली जाहीर करत असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली," अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली होती.
