#

Advertisement

Saturday, April 8, 2023, April 08, 2023 WIB
Last Updated 2023-04-08T11:47:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

राधाकृष्ण विखे पाटील आणि लक्ष्मणराव ढोबळे यांची गळाभेट ठरली लक्षवेधी

Advertisement

सांगोला येथील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उद्‌घाटनास दोन दिग्गज एकाच व्यासपीठावर


सांगोला : राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज (दि.8) मोठ्या दिमाखात करण्यात आले. सोमवारपर्यंत (दि.10) हे संमेलन चालणार असून साहित्य मेजवानीसह यावेळी राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. आज, उद्‌घाटन प्रसंगी व्यासपीठावर संमेलन अध्यक्ष इंद्रजीत भालेराव, स्वागताध्यक्ष आमदार शहाजी पाटील यांच्यासह महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अशातही या कार्यक्रमातही माजी मंत्री शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची गळा भेट लक्षवेधी ठरली.
राधाकृष्ण विखे पाटील आणि लक्ष्मणराव ढोबळे हे राजकीय ज्येष्ठ नेते मानले जातात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर हे दोन्ही दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात स्थिरावले आहेत. माजी मंत्री ढोबळे हे नगरचे पालकमंत्री असताना त्यांनी नगर जिल्ह्यासाठी भरभरून दिले आहे. ढोबळे मंत्री असताना नगरला पाणीप्रश्‍न कधीच जाणवला नाही, त्यामुळे नगर आणि लक्ष्मणराव ढोबळे यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे. त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूरचे दिग्गज नेते मानले जातात. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही भाजपकडून ढोबळे यांचे नाव चर्चेत आहे, त्यामुळे आजच्या ग्रामिण साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावर ढोबळे आणि विखे पाटील यांच्या गळा भेटीला मोठे महत्त्व आले आहे. त्यांच्या या भेटीची चर्चा केवळ व्यासपिठावरच नव्हे तर साहित्य संमेलनासह सोलापुरातही चांगलीच रंगली आहे.
दरम्यान, सांगोल्यातील साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्यासह साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव दादासाहेब रोंगे, सहसचिव उदय घोंगडे, शासकीय समन्वयक व गटविकास अधिकारी आनंद लोकरे, चेतनसिंह केदार-सावंत आदी उपस्थित होते.
रविवारी (दि. 9) ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये डॉ. दत्ता भोसले, योगीराज वाघमारे, भास्कर चंदनशिव, डॉ. कृष्णा इंगोले यांचा गौरव केला जाणार आहे. गौरव समारंभ व समारोपच्या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार शहाजी पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.