Advertisement
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करा, अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेलाय, असं अजित पवार या पत्रात म्हणाले आहेत.
मार्च आणि एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी करणारं पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
