#

Advertisement

Tuesday, April 18, 2023, April 18, 2023 WIB
Last Updated 2023-04-18T11:11:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अजित पवार यांच्या सोशल मीडिया पेजवरून राष्ट्रवादीचं चिन्हं गायब

Advertisement

मुंबई : अजित पवार यांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादी कॉंग्रेस, घडयाळ चिन्ह आणि शरद पवार यांच्यासह स्वतःचा फोटो असलेलं वॉलपेपर डिलीट केलं आहे. मंगळवार सकाळपासूनच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट करण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. पण, आता मात्र ते फोटो डिलीट करण्यात आले आहेत.
राज्याच्या राजकारणात सुरु असणाऱ्या घडामोडींना प्रचंड वेग आला असून, आता अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचं समजत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या सोशल मीजियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरुये याचा अंदाज बांधला जात होता. पण, आता मात्र याच सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगळ्याच घडामोडी समोर येत आहेत.

शरद पवार यांची काय प्रतिक्रिया? 
इथे अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच तिथे शरद पवार यांनी मात्र या चर्चा असत्य असल्याची प्रतिक्रिया देत ते पक्षाचं काम करत असल्याचं स्पष्ट केलं. सासवड येथे माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी अजित पवार आणि पक्षातील घडामोडींवर भाष्य केलं.