Advertisement
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष, समता परिषदेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख माजी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सटाण्याचे माजी नगराध्यक्ष, सुनील मोरे यांनी त्यांच्या समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईला भाजपाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष, समता परिषदेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील मोरे यांनी समर्थकासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यामध्ये काही सरपंचाचा देखील समावेश आहे. सुनील मोरे हे माजी मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीयहोते त्यांनी पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
