#

Advertisement

Tuesday, April 25, 2023, April 25, 2023 WIB
Last Updated 2023-04-25T11:15:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पाटीलबाईला यात्रेला बोलावयचं का ?

Advertisement

बारामती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून तणावाच्या वातावरणामध्येही आहे. पण, अजितदादा बारामतीमध्ये तुफान टोलेबाजी करताना पाहण्यास मिळाले. यावेळी अजितदादांनी कार्यकर्त्यांना पाटीलबाईला बोलावयचं का? असा सवालच केला आणि एकच हश्शा पिकली. 
लग्नाची तारीख आहे की नाही, त्या दिवशी मला माहिती नाही. यात्रा असेल तर रात्री...रात्री कापा-कापी..रात्री तमाशा...मग यात्रेला पाटीलबाईला बोलवायचं का? असा सवाल करताच कार्यकर्त्यांनी एकच कल्ला केला. दादा एवढ्यावरच थांबले नाही, तर 'काय तिचं नाव,... गौतमी... तिला मी मध्ये काही बोललो तर ती म्हणाली, दादांनी मला असं सांगितलं. शेवटी लोकांना, सर्वांना पाहता येईल असं काम करावं एवढंच म्हणणं' असं म्हणताच दादांनी आवरतं घेतलं.