Advertisement
बीड: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाली. तेव्हा ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी बीडमधील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी तिरुपती बालाजीला नवस केला. नवस फेडण्यासाठी 1100 किलोमीटरची पायी वारी करताना कर्नाटकात त्यांचा मृत्यू झाला व रुईकर कुटूंब उघड्यावर आलं. तत्कालिन मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांना घर बांधून देण्याचा शब्द दिला. शिंदे यांनी शब्द पाळल्यानं नुकतंच रुईकर कुटूंब हक्काच्या घरात राहण्यास गेलं आहे.
