#

Advertisement

Tuesday, April 4, 2023, April 04, 2023 WIB
Last Updated 2023-04-04T12:25:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऍड. कोमलताई यांच्या वाढदिनी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी बॅंकेत मुदतठेव उपक्रम

Advertisement

मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर : "बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळा'च्या अध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्‍यक खर्च टाळून गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी बॅंकेत मुदतठेव ठेवण्यात आली. मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात सृष्टी देवकर आणि अक्षरा कोंडापुरे या दोन विद्यार्थिनींना बॅंकेचे मुदतठेव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चिदानंद माळी, बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव दत्तात्रय पाटील, सहशिक्षक मल्लय्या स्वामी, मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. समीना नदाफ उपस्थित होते.
प्राचार्य चिदानंद माळी म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी गरिबांच्या शिक्षणाची सोय केली, त्यांचा आदर्श घेऊन माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी राज्यभर शिक्षण संस्थांची उभारणी केली आहे. राजर्षी शाहू महाराजांचा शिक्षणाचा वसा पुढे चालवण्यासाठी मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. याप्रसंगी दत्तात्रय पाटील, मल्लय्या स्वामी, प्राचार्या डॉ. समीना नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. वासंती पांढरे, प्रा. तय्यब शेख, प्रा. देवकांत गुरव, प्रा. सचिन हेडे, प्रा. वर्षा माने, प्रा. रेश्‍मा जाधव, रेवप्पा दसाडे, विश्वस्त दीपक कसबे, ग्रंथपाल साळुंखे, लिपीक दसाडे आदी उपस्थित होते. शुभांगी पिल्लारे यांनी प्रास्ताविक केले. अस्मिता बोराळे यांनी सूत्रसंचालन केले. तर भाग्यश्री बेळ्ये यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी. एड.च्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.