#

Advertisement

Tuesday, April 4, 2023, April 04, 2023 WIB
Last Updated 2023-04-04T11:18:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नाशिकमध्ये बहुजन रयत परिषदेचा पाया भक्कम

Advertisement

प्रशिक्षण शिबिरानंतर जिल्हा व शहरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्‍वास

नाशिक : बहुजन रयत परिषदेचे संस्थापक तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनानुसार बहुजन रयत परिषदेने नाशिक जिल्हा तसेच शहरात आपले स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करीत आगामी काळातील सामाजिक आणि राजकीय आव्हाने स्विकारण्यासाठी पाया भक्कम केला आहे. येत्या काही काळात राजकीय पक्षाकडे वाटचाल सुरू असलेल्या बहुजन रयत परिषदेने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढविल्या तर विजयी उमेदवरांत बहुजन रयत परिषदे चांगला आकडा गाठू शकते, असा आत्मविश्‍वास नाशिक मधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केला.
नाशिक जिल्हा बहुजन रयत परिषद तसेच नाशिक शहराच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे तसेच प्रदेशाध्यक्ष रमेशतात्या गालफाडे, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे यांच्या सूचनेनुसार रविवारी (दि.2) बहिणाबाई महिला महाविद्यालयामध्ये झाले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी लक्षवेधीच्या प्रतिनिधींशी बोलताना सदर आत्मविश्‍वास व्यक्‍त केला.
बहुजन रयत परिषदेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी यांनी चळवळीचे महत्त्व समजून घ्यावे. कार्यकर्त्यांनी बहुजन, दिन दलित, वंचित समाजाचे प्रश्न समजून घ्यावेत. बहुजन रयत परिषद जिल्ह्यातील तळागळातील माणसांप्रर्यंत पोहचली पाहिजे. संघटनेचे जिल्ह्यात 5000 सभासद व्हावेत, यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, गाव तेथे शाखा सुरू करावी या मुद्यांवर या शिबिरात मार्गदर्शन तसेच चिंतन करण्यात आले.
बहुजन रयत परिषदेची घटना, संघटनेचा रजिस्टर नंबर, संघटनेच्या अजेंड्यावर असलेले अ, ब, क, ड, वर्गीकरण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या 68 शिफारशींची अंमलबजावणी, साहित्यरत्न अण्णाभाऊ यांना भारतरत्न मिळाला पाहिजे, वस्ताद लहुजी साळवे पुणे संगमवाडी येथील व चिराग नगर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे, बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्यात यावी, अशा अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बहुजन रयत परिषदेच्या विविध आघड्यांवर सुद्धा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी यासह खेळीमेळीच्या वातावरणात सहभोजनासह मार्गदर्शन शिबीर झाले.
यावेळी राज्य कार्यकारीणी सदस्य साहेबराव शृंगार, जिल्हा अध्यक्ष नानासाहेब खंडाळे, शहर अध्यक्ष अंबादास अहिरे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस नाना जाधव, युवक जिल्हा अध्यक्ष समाधान अहिरे, ज्येष्ठ जिल्हा नेते अशोक साठे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मालेगाव तालुका अध्यक्ष कैलास वाकळे, मालेगाव तालुका उपाध्यक्ष आकाश आढांगळे, मालेगाव शहर अध्यक्ष संजय शेलार, कळवण तालुका अध्यक्ष युवराज जमदाडे, सटाणा तालुका अध्यक्ष अरूण शेलार, सटाणा शहर अध्यक्ष जितेंद्र देवरे, देवळा तालुका अध्यक्ष विजय जाधव, येवला तालुका अध्यक्ष नवनाथ पोळ, येवला शहर अध्यक्ष अमोल खैरनार, नांदगाव तालुका अध्यक्ष पवन वाघचौरे, नाशिक तालुका अध्यक्ष तुषार बकुरे तसेच गणेश पगारे, उमेश पाथरे, योगेश कसबे, नाना पगारे, गणेश पाथरे, अंकुश केदार, मेहुल मोहिते, बाळा बागुल, आकाश पगारे, गणेश देवरे, फिलिप देसाई, युवराज अहिरे, श्रीकांत अहिरे, रवींद्र केदार जालिंदर वाघचौरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.