#

Advertisement

Thursday, April 20, 2023, April 20, 2023 WIB
Last Updated 2023-04-20T11:38:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आरोग्य खात्यातला 'मुन्नाभाई' : वैद्यकिय शिक्षण नसतानाही चक्क आरोग्य अधिकारी म्हणून सेवेत

Advertisement


छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडमध्ये एक बोगस डॉक्टर तब्बल 5 वर्षे सरकारी सेवेत कार्यरत होता. कोणतंही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तो रुग्णांची तपासणी करत होता.. तसच त्यांच्यावर उपचारही करत होता.. मोहसिन खान शेरखान पठाण असं त्याचं नाव आहे. आरोग्य विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे.  त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . बनाव उघडकीस आल्याचे कळताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तब्बल पाच वर्षे आरोग्य विभागात हा बोगस डॉक्टर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम करत असल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये समोर आल आहे. डॉक्टर नसतानाही रुग्णांची तपासणी करून उपचारही केले. आरोग्य विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या तोतया डॉक्टरचा पर्दाफाश झाला. मोहसिन खान शेरखान पठाण असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2019 पासून तो कार्यरत होता. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 'बीएएमएस' उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे.