Advertisement
अमरावती : आम्हाला एक महिना भर जेलमध्ये ठेवणार होते, माझी लहान मुलं सुद्धा मला विचारत होती, तुम्हाला कशाला जेलमध्ये ठेवलं, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार नवनीत राणा हे सुद्धा भावुक झाले.
आज हनुमान जयंतीच्या आणि नवनीत राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावती शहरात 111 फुटाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प राणा दाम्पत्यानी केला होता. त्या निमित्ताने आज हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 'उद्धव ठाकरे स्व:ताचा पक्ष सांभाळू शकले नाहीत, पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत, आज बाळासाहेब ठाकरे देखील आश्रू ढाळत असतील असा जोरदार टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
आम्हाला दोघांना जेलमध्ये टाकलं होतं, जेव्हा रवी राणा हे भेटायला आले, तेव्हा मी रडली तेव्हा माझ्यावर बोट उचलले. माझा MRI झाला तेव्हा माझ्यावर बोट उचलले, मी एक गोष्ट सांगते. राम भगवंताने अच्छे अच्छे का घमण्ड मीट्टी में मिला दिया उद्धव ठाकरे तुम किस खेत की मुली हो' असे वक्तव्य नवणीत राणा यांनी केलं. माझी काय चूक होती? राज्यावरचं संकट दूर व्हावं म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावं एवढीच विनंती मी केली होती. मात्र तेव्हा आम्हाला 14 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बारा तास उभ ठेवलं, तुरुंगात पाणी सुद्धा दिलं नाही, मुलं विचारायचे आई तु काय गुन्हा केलास? असं राणा यांनी म्हटलं आहे.
