#

Advertisement

Thursday, April 6, 2023, April 06, 2023 WIB
Last Updated 2023-04-06T10:14:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सावरकर गौरव यात्रेत मुंडे भगिनींनी गैरहजर

Advertisement

बीड : भाजप आणि शिवसेनेच्या वतीने राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. आज बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली.  या सावरकर गौरव यात्रेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या गैरहजर राहिल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 
 विशेष म्हणजे, याआधीही बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते. यावेळी जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे गैरहजर होत्या.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात स्थानिक नेते मंडळींची उपस्थिती होती. मात्र पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे या दोघांचा गैरहजर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पक्षाचा कार्यक्रम असताना या कार्यक्रमास दोन्ही भगिनींची अन्उपस्थिती का लावली नाही?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करत वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजी करत निघालेल्या मोटरसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यकर्त्यांनी गळ्यात गमचा आणि डोक्यावर "मी पण सावरकर" लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.