Advertisement
पुणे : मुंबई-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत
एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात यावा, या संदर्भात सोलापूरचे माजी मंत्री
लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या तथा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड.
कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी नुकतान वंदे भारत एक्स्प्रेसने पुणे-सोलापूर प्रवास
केला. परंतु, सरद एक्स्प्रेस मुंबईतून सुटण्याची तसेच पुणे स्टेशनवर येण्याची वेळ
गैरसोयीची ठरत असल्याने यामध्ये काहीसा बदल करण्यात यावा, अशी मागणी ऍड. कोमलताई
यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे (ई-मेल) केली आहे.
वंद भारत एक्स्प्रेस मुंबईहून संध्याकाळी सहा वाजता सोडावी, अशी मागणी ऍड. कोमलताई
यांनी केली आहे.
मुंबई-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मुंबईहून ही रेल्वे दुपारी 4.05
मिनिटांनी सुटते. सोलापूरला रात्री 10. 40 मिनिटांनी पोहचते. मुंबईहून सुटण्याची
वेळ लवकर असल्याने प्रवाशांना कामे अर्ध्यावरच सोडून यावे लागते. त्यामुळे काही
प्रवासी मुंबईहून परत येताना सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापूर गाठतात, त्यामुळे
वंद भारत एक्स्प्रेसची वेळ बदलणे गरजेचे आहे. वेळ बदलल्यास प्रवाशांचा आणखी
प्रतिसाद लाभेल तसेच यातून उत्पन्नही वाढेल, असे ऍड. कोमलताई यांनी म्हटले आहे.
सध्या, वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वे पुणे येथे संध्याकाळी 7.10 मिनिटांनी
येते. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ते सोलापूरकडे मार्गस्थ होते. वेळ बदलल्यास पुण्यात
येणाऱ्या वेळेतही बदल होईल. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सकारात्मक
असल्याने एप्रिल किंवा मे महिन्यात याबद्दल नोटिफिकेशन काढून एक्सप्रेसची वेळ
बदलली जाण्याची शक्यता आहे.
ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे... आज 'वंदे भारत' या रेल्वेने प्रवास केला. जमीनीवर चालणाऱ्या विमानाचा भास करून देणारा अनुभव आला. अर्थात तिकीटाची किंमत व सर्वच सुविधा बघता वंदे भारत ही एक्साईज ऑफिसर व उद्योजकांना परवडणाऱ्या आहेत. माझ्या देशाचा होतकर वर्ग याचा सहज लाभ घेऊ शकणार नाही. हि रेल्वे चालू करण्यामागचा हेतू खुप चांगला आहे. होतकरु बहुजन वर्गाला उद्योजक होण्याबद्दलचे महत्व पटवून देण्याचा शासनाचा मानस समाधानकारक आहे.

