Advertisement
पिंपरी : महिलांनी
स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबाची काळजी घेणारी महिला
कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. प्रत्येक स्त्री जागरूक व्हावी आणि समाजात
त्यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बहुजन रयत
परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
जागतिक
आरोग्य दिनी सावली फाउंडेशच्यावतीने महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते. याचे उद्घाटन प्रसंगी ऍड. कोमताई बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री
लक्ष्मणराव ढोबळे, बहुजन रयत परिषदेच्या ऍड. शुभा पिल्ले यांच्यासह बचतगटातील महिला
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी ऍड. कोमलताई यांनी महिलांचे आरोग्य आणि
त्यांचे निराकरण याविषयी मार्गदर्शन करताना सकस आहार, नियमित व्यायाम, योगा आणि
वैद्यकीय सल्ला खूप महत्त्वाचे असल्याचेही नमूद केले. यावेळी त्यांनी बचत गटातील
महिलांना आर्थिक स्थैर्य आणि यासाठी लघु तसेच मध्यम उद्योगाची गरज याबाबत माहिती
दिली. शिबिरावेळी उपस्थित डॉक्टरांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
