#

Advertisement

Monday, April 3, 2023, April 03, 2023 WIB
Last Updated 2023-04-03T10:12:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

राज्यात 'डीएड' कायमचं बंद होणार?

Advertisement

मुंबई : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला डीएडचा अभ्यासक्रम  कायमचं बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्याऐवजी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना बीएड करावे लागणार आहेत. यासोबत त्यामध्ये स्पेशलायझेशन असणार आहे. केंद्राने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अकृष विद्यापिठांमध्ये जून 2023-24 पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

* नव्या शैक्षणिक धोरणात डीएडचा अभ्यासक्रम नसणार
* पोस्ट ग्रॅच्युएट विद्यार्थ्यांना एका वर्षात बीएड करता येणार आहे
* नव्या धोरणात बीएडबाबत नेमकी तरतूद काय?
* पदवी घेतलेल्या उमेदवारांना दोन वर्षात बीएड पूर्म करता येणार आहे
* बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत
* यामध्ये कोणत्या विषयाचे शिक्षक व्हायचे याची निवड करता येणार आहे