#

Advertisement

Monday, April 3, 2023, April 03, 2023 WIB
Last Updated 2023-04-03T10:19:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

दहावी, बारावी परीक्षांच्या निकालांची तारीख समोर

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2022 - 23 या शैक्षणिक वर्षासाठी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थांची सुट्टी सुरु झाली आणि सुट्टीला महिनाही पूर्ण होत नाही, तोच या परीक्षांच्या निकालांची माहिती समोर आली आहे.
यंदाच्या वर्षी  इयत्ता दहावीसोबतच इयत्ता बारावीच्या परीक्षांचे निकाल निर्धारितक वेळेतच लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे निकाल लागतील. तर, 10 जूनपर्यंत इयत्ता दहावीचे निकाल लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, प्रलंबित मागण्या आणि जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षण वर्ग, शिक्षकेतर वर्गानं काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाचे या निकालांवर काही परिणाम होणार का, याचीच चिंता विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात आली होती. पण, आता मात्र हे चित्र अधिक स्पष्ट झालं असून, य़ा 8 दिवसांच्या संपाचा विद्यार्थ्यांच्या निकालांवर परिणाम होणार नसून, उत्तर पत्रिका तपासणीसाठी अपेक्षेहून जास्त वेळ दवडला जाणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं मे महिना अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे आणि त्यामागोमागच इयत्ता दहावीचे निकाल लागणार आहेत.